हृदयविकाराने त्रस्त असलेल्या तेरा दिवसाच्या मुलाला उपचारासाठी मुधोळहून बेळगावला वाहनातून आणत असताना शहरात प्रवेश केल्यावर झिरो ट्रॅफिक व्यवस्था पोलिसांनी करून रुग्णाला नेणाऱ्या वाहनाला मार्ग मोकळा करून दिला.
मुबिना यलीगार या मुधोळ हून बेळगावला आपल्या मुलाला उपचारासाठी आणत होत्या.शहरातील रहदारीमुळे वाहन के एल ई हॉस्पिटलला पोचण्यास विलंब होऊ नये म्हणून पोलिसांनी करडीगुद्दी पासून के एल ई हॉस्पिटल पर्यंत झिरो ट्रॅफिक व्यवस्था केली.त्यामुळे रुग्णाला नेणारे वाहन कोणत्याही अडथळ्याविना हॉस्पिटलला पोचले.
सायंकाळी 4.20ते 4.45 या वेळेत झिरो ट्रॅफिक करून मारिहाळ, माळमारुती पोलिसांनी वाहनाला मार्ग मोकळा करून दिला.याबद्दल पोलीस खात्याचे मुबिना यलीगार यांनी पोलीस खात्याचे आभार मानले आहे.
सध्या स्मार्ट सिटीच्या कामांमुळे बेळगाव शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची खुदाई सुरू आहे त्यातच झिरो ट्राफिक करून पोलिसांनी रुग्णाला मदत केली आहे.