काही दिवसांपूर्वी बेळगाव तसेच उत्तर कर्नाटकात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे अनेकजण चिंतेचे छायेत होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागला होता. अनेक सुगीची कामे अर्धवट ठेवून पाऊस जोरात झाला तर काय करावे या विवंचनेत असताना पुन्हा वातावरण स्वच्छ झाले. त्यानंतर शेतकरी पुन्हा कामात गुंतलो आहे. सध्या थंडीचा जोर वाढू लागला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्याच्या इतर भागात काही हलकासा पाऊस पडला तर काही ठिकाणी मोठ्या सरी कोसळल्या. यामुळे जिल्ह्यातील थंडी गायब झाली होती. आता पुन्हा ढगाळ हवामान निवळल्यानंतर मागील आठवडाभरापासून आता थंडी वाढू लागली आहे. शेतकऱ्यांतून समाधान होत असून सुगी कामाला वेग आला आहे. काही प्रमाणात सुगीची कामे आटोपली असून पेरणीच्या कामात शेतकरी असल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव जिल्ह्यातही सध्या ऊस गाळपाचे हंगाम जोरदार सुरू आहे. याचबरोबर भाताच्या मळण्याही सुरू आहेत. येत्या आठवडाभरात ही सर्व कामे शेतकरी आटोपती घेणार आहे. त्यानंतर पेरणी करून रब्बी हंगामाकडे डोळे लावून बसणार आहे. उघडीप मिळाल्यामुळे केवळ दहा ते पंधरा दिवसात शेतकरी सर्व कामे उरकून टाकली. मागील काही दिवसापासून वातावरण स्वच्छ झाल्याने हिवाळ्याची जाणीव होऊ लागली आहे.
सध्या हरभरा व चनी तसेच इतर पालेभाज्या करण्याकडे शेतकरी वळला आहे. अजूनही काही भागात मळणी व इतर कामे सुरू असून ती आटोपन्यासाठी शेतकरी घाई गडबड करू लागला आहे. आता वातावरण स्वच्छ झाल्याने थंडीत वाढ होऊ लागली असून गुलाबी थंडीचा अनुभव अजूनही आला नाही. डिसेंबर उलट आल्याने थंडीत वाढ होत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.