Friday, March 29, 2024

/

अनगोळ शेतकऱ्यांना अधिकारी लोकप्रतिनिधी संपवणार आहेत का ?

 belgaum

वादग्रस्त हलगा- मच्छे बायपास रस्ता आणि शिवारात शिरणाऱ्या गाळाने भरलेल्या नाल्यातील पाणी यामुळे जुने बेळगाव, शहापूर व अनगोळ येथील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अनगोळ शिवाराची स्थिती पाहता संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी तेथील शेतकऱ्यांना संपणारच आहेत की काय? असा सवाल केला जात आहे.

मागच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. यात भर म्हणून बेकायदेशीररित्या सूरु असलेला हालगा-मच्छे बायपासमुळे तर परिसरातील शेतकरी व त्यांच्या कुटूंबांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा मानसिक ताण सहन न झाल्याने यापट्ट्यातील शहापूर व जूनेबेळगावच्या दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्राच संपवली आहे. कारण त्यांचा मुख्य व्यवसाय शेतीच असल्याने त्यांचं जगण्याचं साधनच गेलं. त्यात नोकऱ्याही अशाश्वत. अनेक शेतकऱ्यांची तर यात पूर्ण शेतीच गेली. त्यामुळे पर्यायी शेती नसल्याने हे अल्पभूधारक शेतकरी मोठ्या संकटात अडकले आहेत.

कधी कुठे शेतीवर कर्ज काढून माहित नसलेल्या शेतकऱ्यांनी पोटापुरती असलेली शेती घालवण्यापेक्षा आता स्व:ताच्या नावे कर्ज काढून उच्च न्यायालयात दावा दाखल करुन हलगा- मच्छे बायपासच्या कामाला स्थगिती मिळवली आहे.

 belgaum

महापूराने आणि बळ्ळारी नाल्यात भरलेल्या गाळामुळे पाणी डुंबून शिवारातील भात पीकंतर नष्ट झालीच पण आता पुढची उन्हाळी रब्बी पीकं घ्यायच म्हटल्यास शिवारातील पाणी निचरा न होता अजूनही शेतात साचून आहे. हा प्रकार सर्वाधिक अनुभव शिवारात पहावयास मिळत आहे.

दुसरी समस्या येळ्ळूर रस्त्याला लागून येळ्ळूर व अनगोळकडून येणाऱ्या बळ्ळारी नाल्याची आहे. बळ्ळारी नाल्यातून येणारे पाणी नाल्यातून खाली येते. तथापी शेतकरी व लोकांची नजर चुकवून कोणीतरी या नाल्यातच ट्रकनी मोठ्या प्रमाणात मातीचा भर टाकल्याने वरून येणारे पाणी बळ्ळारी नाल्याकडे न येता परत एकदा अनगोळ शिवारात जात आहे. परिणामी अनगोळ शिवार परिसरात पाणीच पाणी भरले आहे. सदर तुंबलेले पाणी शेतकऱ्यांनी उभारलेल्या भाताच्या गंज्यांमध्ये शिरल्याने भाताचे लोंब भिजून गेली आहेत. आता ते भात मळून घरी आणायच म्हटलंतरी मोठी अडचण झाली आहे. अशाने अनगोळ शिवारातील पोटापुरते उभे असलेले भातपीक व कापलेले भात मातीमोल झाले आहे. रब्बी पीकंतरी मीळेल म्हणून आशेवर जगलेले शेतकरी मोठे चिंताग्रस्त झाले आहेत.

तेंव्हा अनगोळ भागातील छोट्या शेतकऱ्यांना समस्यामुक्त करण्यासाठी संबधीत अधिकारी तसेच लोकप्रतिनिधीनी प्रत्यक्ष पाहणी करुन आताची रब्बी पीकं घेण्यासाठीतरी आत्मियतेने दिलासा द्यावा अशी शहापूर, येळ्ळूर, वडगाव, अनगोळ भागातील शेतकरी बंधु विनंती आहे. तथापि अद्यापही याकडे दुर्लक्ष झालेले असल्याने अनगोळ शिवारातील शेतकऱ्यांना संबधित अधिकारी, लोकप्रतिनिधी संपवणारच आहेत कि काय ? असा सवाल करण्यात येत आहे.

राजू मर्वे-शेतकरी नेते वडगांव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.