क्रिमिनल प्रोसिजर कोड (सीआरपीसी) मधील 144 कलमान्वये कोणत्याही राज्य अथवा प्रदेशातील मुख्य कार्यकारी दंडाधिकार्यांना 4 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करणारा अर्थात जमावबंदीचा आदेश जारी करण्याचा अधिकार आहे. कायद्याने या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंगल माजविण्याचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.
समाजातील शांतता व सुरक्षिततेला धोका पोहोचवणारे प्रकार घडणार असतील तर त्यांना आळा घालण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 144 कलम लागू केले जाते. सध्या बेळगावात ही हे कलम लागू करण्यात यात आले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी जातीने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
नागरिकत्व विधेयक कायद्याच्या विरोधात देशभरात विविध संघटनांनी निषेध आणि बंदचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव शहरात 18 डिसेंबर रोजी रात्री 10.15 वाजल्यापासून शनिवार 21 डिसेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
नागरिकत्व विधेयक कायद्याच्या विरोधात डावी आघाडी आणि मुस्लिम संघटनांनी उद्या शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. यामुळे देखील विशेष खबरदारी म्हणून मुख्य कार्यकारी दंडाधिकारी दंडाधिकाऱ्यांनी बेळगाव शहरात जमाव बंदी लागू केली आहे.
पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी जमाव बंदी काळात बंदोबस्त कसा करावा याबाबत पोलिसांना मार्गदर्शन केलं.