स्टार एअर बेळगाव ते इंदोर विमानसेवा जानेवारी 2020 पासून प्रारंभ करणार आहे.त्याला नागरी उड्डाण महासंचालकांची परवानगी मिळाली आहे.
बेळगाव ते इंदोर उडाण 3 योजने अंतर्गत विमानसेवा सुरू होणार असल्याची इंदोर येथील अहिल्याबाई होळकर विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.जानेवारी 2020 पासून बेळगाव इंदोर सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत.पण अद्याप स्टार एअरने अधिकृत घोषणा केलेली नाही.
बेळगाव ते किशनगड (अजमेर) मार्गावरील विमानसेवेला मान्यता मिळाली आहे.बेळगावहून इंदोरला जाणारे विमानच पुढे किशनगडला जाणार असून ही सेवा केव्हापासून सुरू होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बेळगाव विमान तळावरून अहमदाबाद व्यतिरिक्त उत्तर भारतातील मोठया शहराला जोडणारी थेट विमानसेवा सुरू झालेली नसून जानेवारी महिन्यात बेळगाव इंदोर विमान सेवा सुरू होणार आहे बेळगाव हुन इंदोरला उड्डाण घेतलेले विमान पुढे अजमेर (किशनगड) पर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे बेळगावहून अजमेरला जाणाऱ्याना या विमानाचा फायदा होऊ शकतो.