बेळगाव शहराचा कायापालट होणार यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून विकासाची गंगा वाहु असे भासविण्यात अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना या स्मार्ट सिटीकजी उद्दिष्ट कोणती आहे हेच माहिती नाही. याची आठवण पुन्हा एकदा करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठा गाजावाजा करण्यापेक्षा विकासाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. असे असतानादेखील याकडे संबंधित यांनी दुर्लक्ष करून उद्दिष्टांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
शहराला एक स्वतंत्र ओळख निर्माण करून देणे हा या स्मार्ट सिटीचा उद्देश आहे. ही ओळख आर्थिक विकासाच्या प्रकल्पावर आधारित असणार होती. यामध्ये शिक्षण आरोग्य कला संस्कृती क्रीडा फर्निचर क्रोकरी होजिअरी आणि वस्त्रोद्योग किंवा डेअरी सारख्या उपक्रमांचा समावेश होणार होता. मात्र यापैकी कोणताही उद्दिष्ट अधिकाऱ्याने साधला नाही. कोणत्याही नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी शहरांना सक्षम करणे हा एक महत्त्वाचा भाग यामध्ये समाविष्ट करण्यात आला होता. मात्र त्याला अनुसरून असे काहीच झाले नाही त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
शहरांना वातावरणाला कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार करण्याचे आव्हान स्वीकारले जाणार होते. वृक्षारोपण व इतर उपक्रमांच्या माध्यमातून शहरी इको-फ्रेंडली बनविणे हा एकच उपाय नसून त्यासाठी रस्ते व इमारतींची रचना आणि इतर पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार होता. मात्र तसे झाले नाही. स्मार्ट शहरात प्रशासन हे कमी खर्चात नागरिकांची जास्तीत जास्त कामे करणारे आणि मित्रत्वाचे नाते जपणारे असेल अशी ओढ निर्माण करण्याची गरज होती. मात्र नागरिकांचा रोष अधिक दिसून येत आहे.
प्रशासन पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने कार्यरत राहणार होते. त्यामुळे कामाचे पूर्णपणे मोजमाप मिळू शकेल आणि पारदर्शक व्यवहारातील त्याची दखल घेतली जाणार असे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रशासकीय कामकाजात खर्च कमी करण्यासाठी मोबाईलवर सर्व प्रकारच्या सोयी सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. त्यामुळे नागरिकांना प्रत्येक कामासाठी प्रशासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत याची काळजी घेण्यात येणार होती. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी ग्रुप स्थापन करण्याच्या हालचाली या स्थितीतून होणार होत्या. मात्र तसे काही झालेच नाही. त्यामुळे नेमके उद्दिष्ट साधण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
आवश्यक ठिकाणी जाण्यासाठी दरवेळी वाहनाची गरज भासू नये यासाठी शहराच्या प्रत्येक भागात चालुन जाण्याच्या अंतरावर प्रशासकीय कार्यालयांची शाखा निर्माण केल्या जातील असा उद्दिष्ट यामध्ये होता. वाहनांचा कमीत कमी वापर करून हवा प्रदूषण रोखणे आणि नागरिकांच्या प्रवास खर्चात कपात करणे हा उद्देश स्मार्ट सिटीत आहे. रस्त्यांची रचना फक्त वाहनांसाठी न करता सायकल स्वर आणि पादचाऱ्यांसाठी ही स्वतंत्रपणे करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र येथील कामकाजाचा बट्ट्याबोळ पाहता तसे काही झाले नाही. त्यामुळे अनेकदा अधिकाऱ्यांना स्मार्ट तिच्या उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत जाणकार आतून व्यक्त होत आहे.