मुलांना आकर्षित करण्यासाठी आता अंगणवाडीचे स्वरूप पालटणार आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उपनगरातील 43 अंगणवाड्यांसाठी निधी मंजूर झाला आहे.
इतकेच नाही तर थेट डिजिटल शिक्षण देण्यात येणार आहे. अंगणवाड्यांमध्ये आरोग्य, स्वच्छता व शिक्षण या त्रिसूत्रीवर भर देण्यात येणार आहे. या कामासाठी एकूण 4 कोटी 40 लाख रूपये खर्च येणार आहे. या निधीतून खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडी असेच रंगकाम, फरशा बसवणे, खिडक्या बसविणे आदी कामे केली जाणार आहेत.
शहर परिसरात एकूण 57 अंगणवाड्या असून यापैकी अकरा अंगणवाड्या बाल कल्याण खाते सांभाळते, तर तीन अंगणवाड्या दयनीय अवस्थेत आहेत. त्यामुळे 43 अंगणवाड्यांची जबाबदारी स्मार्ट सिटी विभागाने घेतली आहे. आता लवकरच अंगणवाड्यांचे स्वरूप पालटणार असल्याने नागरिकांत विशेष करून अंगणवाडी शिक्षकवर्गात समाधान व्यक्त होत आहे.