कडोली येथे खेळत असलेल्या एका सहा वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत काकती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
कडोली येथील एका 26 वर्षीय तरुणाने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत काकती पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून त्यानंतरच याचे निश्चित कारण स्पष्ट होणार आहे. मात्र याबाबत गावात उलट सुलट चर्चा सुरु आहेत.
कडोली येथील 26 वर्षीय तरुणाने सहा वर्षे बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून अनेक आतून संताप व्यक्त होत आहे. मात्र याबाबत काही उलटसुलट चर्चाही ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे नेमके कारण स्पष्ट कधी होणार याकडे सार्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
याबाबत काही पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. मात्र त्या तरुणांविषयी गावात चांगल्या प्रतिक्रियादेखील उमटत असून नेमकी तक्रार करणाऱ्याने कशासाठी तक्रार केली आहे. याचा उलगडा लवकरच होणार आहे. सहा वर्षे बालिकेवर अत्याचार झाल्याने अनेक आतून संताप व्यक्त होत असला तरी याबाबत काही अंतर्गत वादिवादी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
Gram pachayat mastmardi made par a vevahar calaya kupaya kontya adikarila samband yatoy laksha deya