गोकाक विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे लखन जारकीहोळी यांना निवडून आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.आपला उमेदवार नक्की निवडून येईल असा आत्मविश्वास सतीश जारकीहोळी यांना आहे.
सतीश हे केवळ काँग्रेसच्या पारंपारिक मतावर अवलंबून नाहीत तर त्यांनी प्रचारा दरम्यान आपल्या मुत्सद्दीगिरीची चुणूक दाखवली आहे रमेश जारकीहोळी यांच्यावर थेट हल्लाबोल न करता त्यांचें मेहुणे अंबिरराव पाटील यांच्या वर त्यांनी निशाणा साधला होता.निधर्मी जनता दलाचे अशोक पुजारी यांना उमेदवारी दाखल करायला लावण्यात सतीश यांचा सहभाग असल्याचे चर्चिले जात आहे.
अशोक पुजारी यांच्या समर्थकानी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा म्हणून मोठे आंदोलन छेडले होते.निवडणूक लढवणार नसाल तर आम्हाला विष द्या नाहीतर विहिरीत ढकलून द्या अशी भूमीका पूजारी समर्थकांनी घेतली होती त्यामुळे पुजारी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.पुजारी समर्थकांच्या आंदोलनाला सतीश यांचीही ताकत लागली होती अशी चर्चा आहे.पुजारी यांच्या उमेदवारी मुळे भाजप आणि लिंगायत समाजाच्या मतांचे विभाजन होणार आहे.
बुद्ध बसव आणि आंबेडकर यांचे विचार व्यक्त करून प्रचार करणारे शंभर कार्यकर्ते गावोगावी मतदारांच्या भेटीगाठी घेत होते प्रचाराच्या काळात या युवकांनी खेड्यातच मुक्काम ठोकला होता आपल्या दलित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दलित मतदारांची मने जिंकण्यात सतीश यशस्वी झाले आहेत. सतीश शुगर्सच्या माध्यमातून गोकाक तालुक्यातील प्रत्येक गावात सतीश यांचा बोलबाला झालेला आहे.
या मतदार संघात 55 हजार हुन अधिक मते अनुसूचित जाती जमातीची आहे त्यामध्ये वाल्मिकी समाजाचा ही समावेश होतो आज पर्यंत रमेश यांच्या पाठीशी असणाऱ्या आपल्याकडे वळवण्यासाठी देखील सतीश यांनी प्रयत्न केले आहेत. या शिवाय अनेक गावातील लिंगायत धनगर आणि मुस्लिम समाजातल्या नेत्यांना भेटण्यासाठी सतीश हे गावोगावी फिरत आहेत.या साऱ्याचा परिणाम लखन जारकीहोळी यांचे पारडे जड होण्यात झाला आहे.