मागील काही दिवसापासून तालुक्यात अघोषित वीजपुरवठा करण्यात येत असल्याने अनेक आतून संताप व्यक्त करण्यात आहे. शिवारातील परिसरात किमान चार ते पाच तास वीज पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी होत असताना वीज खंडित करून शेतकर्यांची हेळसांड करण्यातच विज महामंडळाने धन्यता मानली आहे. त्यामुळे यापुढे तरी वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.
वारंवार वीज खंडित केल्याने पिकांना पाणी पाण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होत आहे. परिणामी भारनियमनाचा प्रश्न पुन्हा एकदा होणार का अशी भीती व्यक्त होत आहे. रब्बी हंगामातील कडधान्ये व भाजीपाला पिकांचे सुरळीत सिंचनाअभावी नियोजन कसे करावे याकडे शेतकऱ्यांची आशा लागून राहिली आहे. मात्र हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे सुरळीत 3फेज वीजपुरवठा द्यावा अशी मागणी होत आहे.
गेल्या काही दिवसापासून अघोषित वीज कपात करण्यात येत आहे. सध्या शेतकरी रब्बी हंगामातील पेरणीकडे वळला आहे. अशा परिस्थितीत कडधान्यांना पाणी कसे पाजवावे या विवंचनेत सध्या शेतकरी आहे. रात्रीच्या वेळी वीज करण्यात येत असल्याने अनेकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करावे अशी मागणी होत आहे.
चोवीस तास वीज पुरवठा करण्यात येईल असे लोकप्रतिनिधी सांगितले होते. त्यानंतर तालुक्यातील पूर्व भागात मोठी समस्या निर्माण झाली आहे. होनगा परिसारात अवजड टॉवरचे काम घालण्यात आले आहेत. मात्र तरी देखील वीज पुरवठा सुरळीत का करण्यात येत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचबरोबर औद्योगिक वसाहतीमध्ये विजेचे नियोजन नसल्याने समस्या मोठ्या प्रमाणात होत असून त्याचे नियोजन करून योग्य वेळेत वीजपुरवठा द्यावा अशी मागणी होत आहे.