कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी आणि सहा चाकी वाहनांच्या पार्किंग सुविधांच्या ठिकाणी पार्किंग शुल्क आकारणीसाठीचे कंत्राट देण्यासाठी बेळगाव कँटोन्मेंट बोर्डाने निविदा मागविल्या आहेत.
बेळगाव कॅंटोन्मेंट बोर्डाच्या खालील ठिकाणी असलेल्या पार्किंगच्या सुविधा असणाऱ्या जागांसाठी या निविदा मागवण्यात आल्या आहेत.
1) जनावरांच्या बाजारातील आतील जागा 2) कलादगी रस्ता दुतर्फा 3) न्यू हेड पोस्ट ऑफिस रोड 4) बेऊर रोड 5) वेंगुर्ला रोड 6) सेंट झेवियर्स हायस्कूल समोरील वेंगुर्ला रोड 7) रेल्वे स्टेशन समोरील दोन्ही बाजूची जागा 8) रेल्वे स्टेशन बस स्टँड 9) धर्मवीर संभाजी चौक (बोगरवेस) ओएआर बीसी 126 येथील पार्किंग 10) आरटीओ रोड दुतर्फा 11) 32 ओल्ड मोची लाईन समोरील जागा 12) कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिस जवळील जीएलआर एसवाय नं. 27 ही जागा 13) फिश मार्केट समोरील मटन बुचरी स्ट्रीट 14) बीसी नंबर 124 84 150 जवळील जागा 15) उत्तर टेलिग्राफ रोड 16) बीसी नंबर 147 जवळील जागा 17) क्लब रोड आणि पॉइंट रोड समोरील जागा (फक्त जेंव्हा सीपीएड मैदानावर एखादा कार्यक्रमात किंवा समारंभ असताना) कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतील लष्कराच्या आणि शाळांच्या जागा लक्षात घेऊन निर्धारित केलेले पार्किंग शुल्क खालील प्रमाणे आहे.
दुचाकी वाहने- चार तासासाठी 10 रुपये आणि त्यानंतर 20 रुपये. कारगाड्या- चार तासासाठी 40 रुपये त्यानंतर प्रति दोन तासाला 20 रुपये. लोरी (ट्रक)- तासाला 50 रुपये व प्रतिदिन 200 रुपये. बैलगाड्या- प्रति बैलगाडी 10 रुपये. टेम्पो प्रति तासाला 50 रुपये व प्रतिदिन 100 रुपये. तीचाकी, ऑटो- प्रतिदिन 30 रुपये.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून साधारण जानेवारी 2020 अखेर नवीन वर्कऑर्डर जारी केली जाईल त्यानंतर उपरोक्त पार्किंग शुल्क आकारता येणार आहे.