Friday, December 20, 2024

/

‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी नको

 belgaum

तेलंगणा येथे डॉक्टर महिलेवर सामूहिक पाशवी बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या चार नराधमांना एन्काऊंटरमध्ये ठार मारणाऱ्या हैदराबाद पोलिसांविरुद्धचा चौकशीचा आदेश रद्द करावा, अशी मागणी फेसबूक फ्रेंड्स सर्कल बेळगावने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.

शुक्रवारी फेसबूक फ्रेंड्स सर्कल बेळगावचे अध्यक्ष संतोष दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Facebook friends circle demand
Facebook friends circle demand

हैदराबाद येथील डॉक्टर महिलेवर पाशवी बलात्कार करून तिचा जाळून खून करणाऱ्या चार नराधमांचा हैदराबाद सायबर पोलिसांनी शुक्रवारी एन्काऊंटर मध्ये खात्मा केला. पोलीस बंदोबस्तात आरोपींना अधिक तपासासाठी घटनास्थळी घेऊन जात असताना त्यांनी पोलिसांची शस्त्रे हिसकावून त्यांच्यावरच हल्ला चढविला. त्यावेळी आत्मसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते चारही आरोपी ठार झाले. सदर चारही नराधम ठार झाल्याने सर्व सर्वत्र समाधान व्यक्त होत असताना सदर एन्काऊंटर करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचे वृत्त आहे.

हा प्रकार खरोखर चांगला नाही खरेतर त्या नराधमांना यमसदनी पाठवल्याबद्दल संबंधीत पोलिस अधिकार्‍यांचा गौरव झाला पाहिजे. तेव्हा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरील आरोप मागे घेऊन त्यांच्या चौकशीचा आदेश त्वरित रद्द करावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे निवेदन सादर करतेवेळी संतोष दरेकर यांच्यासह फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे अन्य सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.