कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी निरंजना अष्टेकर यांची निवड करण्यात आली आहे.कॅन्टोन्मेंट बोर्डाची आज बैठक पार पडली.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.सदस्यांनी अनेक विषयांवर आपली मते व्यक्त केली.बैठकीत एकमताने निरंजना अष्टेकर यांची निवड करण्यात आली.
मागील बैठकीत उपाध्यक्ष विक्रम पुरोहित यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.उपाध्यक्षपदाची सगळ्यांना संधी मिळावी म्हणून सदस्यांनी प्रत्येकाला ठराविक कालावधीसाठी उपाध्यक्ष पद देण्याचा निर्णय पूर्वीच घेतला आहे.त्यानुसार अष्टेकर यांची निवड करण्यात आली.
सौ अष्टेकर यांचे पती प्रदीप अष्टेकर यांनी यापूर्वी दोन वेळा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे निरंजना या मागील वेळेस महिला राखीव मतदार संघ 2 मधून निवडून आल्या आहेत.काल रात्रीचं बेळगाव live ने अष्टेकर उपाध्यक्ष बनतील अशी बातमी दिली होती आजच्या बैठकी नंतर त्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.