पाच कोटी रोख वाटणार की आर टी जी एस करणार?

0
 belgaum

गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या दोघांत पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगले आहे.गेल्या काही दिवसां पासून सातत्याने त्यांच्यात कलगीतुरा पहायला मिळत आहे.आगामी विधानसभा निकडणुकीत ग्रामीण मतदारसंघात लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पराभव करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च करू वक्तव्य रमेश यांनी केले होते त्या वक्तव्याचा समाचार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतला आहे.

रमेश जारकीहोळी हे पाच कोटी रुपये रोख वाटणार की आर टी जी एस करणार? असा सवाल त्यांनी केलाय.पाच कोटी रु खर्च करण्यासाठी त्यांनी परवानगी घेतली आहे काय?आयकर खाते,निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी असेही हेब्बाळकर म्हणाल्या.जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून विकासासाठी मला निवडून दिले आहे.पैसे घेऊन मते घातलेत म्हणून रमेश जारकीहोळी यांनी मतदारांचा अपमान केला आहे.

bg
Laxmi
Laxmi hebbalkar

आमदार रमेश जारकीहोळी यांनी नावगे येथे हेब्बाळकर यांची राजकीय कारकीर्द संपवण्याची घोषणा केली होती .भविष्यात सतीश जारकीहोळी,लक्ष्मी हेब्बाळकर आणि अंजली निंबाळकर यांना जनता घरी बसवेल. ग्रामीण मतदारसंघात मराठी उमेदवार देऊन त्याला निवडून आणण्यासाठी पाच कोटी खर्च करण्याची घोषणा रमेश जारकीहोळी यांनी केली होती त्याला हेब्बाळकर यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिल आहे.

आता हेब्बाळकर यांच्या या टीकेला रमेश जारकीहोळी कोणते उत्तर देणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे तसे बेळगावातील लोकांना जारकीहोळी आणि हेब्बाळकर यांच्यातील वाकयुद्ध ऐकण्याची सवय झाली आहे.बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे राजकारण चांगलेच तापले असून या निमित्ताने बेळगाव ग्रामीण मतदारसंघात भाजप कडून कोण मराठा उमेदवार असेल किंवा संजय पाटील यांनाच पुढे करण्यात येईल का याबाबत कमालीची चर्चा रंगली आहे या सगळ्यात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका देखील तितकीच महत्वाची मानली जात आहे एकूणच रमेश जारकीहोळी यांच्या टीकेच्या बाणाने आमदार लक्ष्मी हेब्बाळकर बिथरल्या आहेत जोरदार पणे मुकाबला करत आहेत अशीही चर्चा आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.