स्मार्ट सिटी योजने अंतर्गत कमांड सेन्टर नववर्षाच्या प्रारंभी सुरू होणार आहे.विश्वेश्वरय्या नगरमध्ये कमांड सेन्टर सुरू होणार असून त्याचे काम सुरू आहे.दोन आठवड्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे एम डी शशिधर कुरेर यांनी दिली आहे.या कमांड सेन्टर मधून अनेक बाबीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
शहरातील कचऱ्याची उचल व्यवस्थित होते की नाही,पाणी पुरवठा कोणत्या भागात झाला नाही,कोणते पथदीप बंद आहेत,शहरातील वाहतूक कशी चालले अशा अनेक बाबीवर कमांड सेन्टरचे लक्ष राहणार आहे.शहरात बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट पोलमुळे मोबाईल रेंजची समस्या मिटणार आहे.
![New command centre smart city belgaum](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2019/12/IMG_20191211_101700-660x324-1.jpg)
कचरा गोळा करणाऱ्या सफाई कामगाराकडे एक छोटे यंत्र देण्यात येणार असून त्याद्वारे कोणत्या घरातील कचऱ्याची उचल झाले किंवा नाही याची माहितीही मिळणार आहे.
रुग्णवाहिका,अग्निशामक दलाचे वाहन जात असताना रस्त्यावर झिरो ट्रॅफिकची व्यवस्था कमांड सेन्टर करणार आहे.त्यामुळे या वाहनांना ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागणार नाही.