बेळगाव शहर हे सुसंस्कृत लोकांचे गाव म्हणून ओळखले जाते पण या सुसंस्कृत पणाला अलीकडे घडलेल्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे धक्का लागला आहे.काही दिवसां पूर्वीच तीन महिला आणि पाच तरुणांना हनी ट्रॅप प्रकरणात अटक करण्यात आली.
या प्रकरणातील महिला आणि त्यांचे साथीदार पैसेवाले सावज हेरून त्याला भेटायला बोलवत असतं. भेटल्यानंतर त्याच्याशी या महिला लगट करत असत,महिला सोबत लगट करत असलेले दृश्यांचा व्हीडिओ त्यांचे साथीदार न कळत बनवत असतं नंतर काही दिवसांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधून इतकी रक्कम दे नाहीतर तुझे नको त्या अवस्थेतील फोटो व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी देत असत.अब्रूच्या भीतीने धनाढ्य व्यक्ती, राजकारणी, आणि उच्च पदस्थ अधिकारी अब्रू जाईल या भीतीने मु मांगी रक्कम देत होते.या ब्लॅक मेलिंग कडून लाखों रुपये टोळक्याने कमावले होते अखेरीस एका धाडस करून पोलिसांत तक्रार दिल्याने हे सारे प्रकरण उघडकीस आले.
आता हनी ट्रॅपची दुसरी माळ मारुती पोलिसांनी उघडकीस आणली आहे पैसे देण्याचे बतावणी करून कपड्याच्याव्यापाऱ्याला घरी बोलवून त्याचा नको त्या अवस्थेतील व्हीडिओ बनवुन ब्लॅकमेल करणाऱ्या महिला व त्यांच्या साथीदारांना गजाआड करण्यात आले.बदललेले समाज जीवन विविध वाहिन्या वरील मालिकांचा प्रभाव, चैनी कडे झुकणारी प्रवृत्ती यामुळे प्रत्येकाला पैसा हवा आहे मग काही जण हनी ट्रॅप सारख्या रॅकेट मध्ये गुंतून पैसा कमावण्याचा मार्ग स्वीकारत आहेत.
शहरात चाललेले हे प्रकार धक्कादायक आहेत अशा प्रकारा मुळे शहराची आणि सुसंस्कृत नागरिकांची बदनामी होत आहे.हनी ट्रॅपची अशी अनेक प्रकरण बेळगावात सुरू आहेत.पोलिसांना केवळ दोन प्रकरणांचा तपास लागला आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढून शहरात चाललेली हनी ट्रॅप प्रकरणे उघडकीस आणण्याचे पोलिसां समोर मोठे आवाहन उभे आहे.