भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय (सैनिक स्कूल सोसायटी) संचलित विजापूर सह अन्य चार ठिकाणच्या सैनिक स्कूलमध्ये पहिल्यांदाच मुलींना प्रवेश दिला जाणार आहे.
मुलींनाही ही सैनिक स्कूलमध्ये प्रवेश द्यावा असा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयासमोर ठेवण्यात आला होता.
त्याला माननीय संरक्षणमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे यंदापासून विजापूर, चंद्रपूर, घोरखल, कलिकिरी व कोडगु येथील सैनिक स्कूलमध्ये पहिल्यांदाच मुलींना प्रवेश दिला जाणार आहे.
नव्या नियमानुसार या सैनिक स्कूलमधील सहावीच्या वर्गातील एकूण जागांपैकी दहा टक्के जागा मुलींसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. हा नियम फक्त विजापूर चंद्रपूर घोरखल कलिकिरी आणि कोडगु येथील सैनिक स्कूल साठी लागू करण्यात आला आहे.
सैनिक स्कूलमध्ये मुलींच्या प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया गेल्या 26 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून ती 19 डिसेंबर 2019 पर्यंत चालणार आहे. सैनिक स्कूलमध्ये मधील मुलींच्या प्रवेश प्रक्रिये प्रक्रियेबाबत उपरोक्त सैनिक स्कूलच्या प्राचार्यांना सैनिक स्कूल सोसायटीचे इंस्पेक्टींग ऑफिसर ग्रुप कॅप्टन रविकुमार यांनी आवश्यक लेखी सूचना दिल्या आहेत.
तरी सैनिक स्कूलमधील मुलींच्या प्रवेशसाठी इच्छुक असलेल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.