खानापूर तालुक्यातील खानापूर जांबोटी राज्यमार्गावरील ओलमनी नजीक उच्चवडे क्रॉस जवळ बारा फुटी किंग कोब्रा जीवनदान देण्यात आले.बेळगाव तालुक्यातील किणये येथील सर्प मित्र बजरंग डुकरे यांनी मोठ्या शिफारसीने पकडला. सदर किंग कोब्रा सापाची लांबी बारा फूट इतकी होती त्याला पकडून कालमनी जंगलात सोडण्यात आले.
गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ओलमनी येथील हनुमंत चिखलकर हे शेताकडे जात असताना चिखल ॲक्रॉस जवळील इस्कॉन गो शाळेजवळ सदर किंग कोब्रा त्यांच्या नजरेस आला तातडीने त्यांनी ही बाब गावात कळवली व त्यानंतर वनखात्याला देखील ही माहिती देण्यात आली सदर किंग कोब्रा भर रस्त्यावरील एका नाण्याच्या झाडावर चढून राहिला होता सदर सर्पाला पकडणे अवघड होते वन खात्याचे फोरेस्टर विनायक पाटील यांनी किणये येथील सर्पमित्र बजरंग डुकरे यांना पाचारण करण्यात आले व झाडावर चढलेल्या त्या सर्पाला अथक परिश्रम घेऊन सर्व मित्रांनी खाली काढले व त्यानंतर एका पोत्यामध्ये पकडून त्याला कालमनी जंगलात सोडण्यात आले.
बारा फुटी किंग कोब्रा गावातील नागरिकांची मोठी गर्दी रस्त्यावर झाली होती परिणामी रस्त्यावरील वाहतूकही मोठा परिणाम झाला अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर मार्ग खुला झाला पण सर्पाला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती सर्पमित्र बजरंग डुकरे व अनेकांनी सर्पाला पकडण्यासाठी केलेले प्रयत्न पाहून वनखात्याचे फोरेस्टर विनायक पाटील व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
ओलमनी येथे पकडलेल्या किंग कोब्राचा व्हीडिओ
किणये येथील युवा सर्प मित्राने पकडला ओलमनी येथे 12 फुटी किंग कोब्रा
Posted by Belgaum Live on Wednesday, December 25, 2019