स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरातील रस्त्यांची पुनर्बांधणी केली जात आहे. हे काम दर्जेदार होत आहे की नाही याची पाहणी सोमवारी माजी महापौर विजय मोरे यांनी केली.
महत्वकांशी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सध्या बेळगाव शहरातील विविध रस्त्यांच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. हे काम दर्जेदार होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी नागरिकांची देखील आहे, परंतु फार कमी लोक ही जबाबदारी पार पाडताना दिसतात. माजी महापौर विजय मोरे हे अशाच लोकांपैकी एक होत. विजय मोरे यांनी सोमवारी कॅम्प येथील मंगेश होंडा शोरूम समोरील रस्त्याला भेट देऊन सदर रस्त्याचा दर्जा तपासून पाहिला.

शासनाकडून ज्या नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्या सुविधा योग्य आणि दर्जेदार आहेत की नाही याची खातरजमा करून घेणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे असे विजय मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात तयार केल्या जाणाऱ्या रस्त्यांपैकी काही रस्त्यांचा दर्जा चांगला नसल्याच्या तक्रारी कानावर आल्याने आपण स्वतः जातीने यामध्ये लक्ष घातले असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
एक सजग नागरिक म्हणून प्रत्येक बेळगाव कराने देखील आपल्या आजू बाजूला काम चाललं आहे ते कितपत योग्य आहे?नियमानुसार होत आहे की याची माहिती करून घेणे गरजेचे आहे.