बुडाने अनधिकृत वसाहतीवर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.आज सकाळी अनगोळ येथे अनधिकृत वसाहत बुडाने बुलडोझर लावून हटवली.
अनगोळ येळ्ळूर रस्त्यावरील बेकायदा वसाहतीवर बुडाचा हातोडा पडला आहे.अनगोळ मधील सर्व्ह क्र 179 मध्ये बुडा अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
आतापर्यंत बुडाने बेकायदा बारा वसाहतीवर कारवाई केली होती.मध्यंतरी या कारवाईत खंड पडला होता.बेकायदा वसाहतीची बुडाने यादी तयार केली असून आगामी काळात या बेकायदा वसाहतीवर बुडा कारवाई करणार आहे.बुडाच्या कारवाई मुळे बेकायदा ले आऊट करून जागा विकणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.