यावर्षी पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे भातपीकं शेतकऱ्यांची गेलीच पण आता रब्बी पिके तरी शेतकऱ्यांना मिळतात की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बळ्ळारी नाल्यातून पाण्याचा निचरा चागंल्या प्रकारे होत नसल्याने येळ्ळूर, मजगाव,मच्छे शिवारातून येणारे पाणी अजूनही शिवारातच थांबून आहे. त्यात एकाने रस्त्याशेजारील नाल्यातच आठ, दहा ट्रक माती टाकली आहे.त्यामुळे वरुन येणारे पाणी शेतात घूसून परत गणपती मंदीर जवळील नाल्यात येत आहे.
मागच्या पावसाळ्यातील अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. बळ्ळारी नाला आणि बेकायदेशीर होत असलेल्या हालगा-मच्छे बायपासमुळे परिसरातील भातपीकं गेलीच.पण त्यांना रब्बी पीकं तरी थोडी मिळण्याची शक्यता आहे.
पण येळ्ळूर रस्त्याला लागून असलेल्या अनगोळ शिवार परिसरातील बराचसा भाग पाण्याने व्यापला असल्याने शेतातील भातपीकं गेलीच पण आता रब्बी पीकंसूध्दा त्यांना मिळणार नाहीत. आता पेरणी हंगाम संपत आला तरी पुढील पेरणी करता येत नाही .त्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन संबधीत अधिकारी आणी त्या भागाचे आमदारानी लक्ष घालून भातपीकं गेली तरी रब्बीपीकं घेण्यासाठी शेतीमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न करुन शेतकऱ्यांना दिलासा दिल्यास समाधान होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.