मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केवळ आठच दिवसात सीमा प्रश्नी बैठक बोलावत आपण बेळगाव प्रश्नी आक्रमक आहोत हे दाखवून देताना एक व्हा असे सांगत समिती नेत्यांच्या कानपिचक्या केल्या होत्या.त्याला अनुसरून बेळगाव सीमा भागात कार्यरत असलेल्या शिवसेनेचे एकत्रीकरण झाले आहे.
शहापूर भागातील एका हॉटेल मध्ये 2000 साली सक्रिय असलेल्या काही जुन्या शिवसैनिकांची बैठक पार पडली या बैठकीत तिन्ही गटांचे एकत्रिकरण झाले व बेळगावात पुन्हा सेना सक्रिय करण्याचा निर्णय झाला.2000 ते 2004 या काळात शिवसेना जोमात होती त्या नंतर शिरोळकर,मजूकर आणि केरवाडकर आदीनी ती टिकवून ठेवली त्याबद्दल तिघांचे अभिनंदन करण्यात आले.
सद्यस्थितीत बेळगाव सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना महाराष्ट्र एकीकरण समितीत आलेली मरगळ दूर करण्यासाठी सेना सक्रिय करावे याबाबत बैठकीत चर्चा झाली.सीमा भागातील मराठी युवक का राष्ट्रीय पक्षांकडे वळत आहे हे रोखण्यासाठी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण यावर भर देऊन लवकरच पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक घेण्याचे ठरले.जुन्या शिवसैनिकाना एकत्र करून एकी घडवण्याचे काम दत्ता जाधव यांनी केले.
दत्ता जाधव,सुनील देसुरकर,कृष्णा हुंदरे,राजू आजगावकर,प्रकाश शिरोळकर,बंडू केरवाडकर,हणमंत मजूकर, संजय शिंदे,सचिन गोरले,महेश टंकसाळी,दिलीप बैलूरकर आदी उपस्थित होते.शिवसेनेचे एकत्रिकरणं झाले आता समितीचे एकत्रिकरण कधी होणार हा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.