belgaum

जगन्नाथ रथयात्रेची ठरली तारीख

0
274
Iskcon radha gokulanand mandir
 belgaum

बेळगावातील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जगन्नाथ रथयात्रा महोत्सव 30 व 31 जानेवारी रोजी बेळगावात भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे अशी माहिती इस्कॉन बेळगाव चे अध्यक्ष ज्येष्ठ सन्यासी परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी दिली

या रथयात्रेच्या निमित्ताने विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहेत. दिनांक 30 जानेवारी रोजी धर्मवीर संभाजी चौक येथून या रथ यात्रेस प्रारंभ होईल आणि शहराच्या विविध भागात फिरून सायंकाळी सहा वाजता इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरावर पोहोचेल.

तेथे दिनांक 30 व 31 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे या महोत्सवात देशविदेशातून आलेले हजारो भक्तगण सहभागी होणार आहेत

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.