महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर थांबवून गोळ्या घाला अशी गरळ कर्नाटक नवनिर्माण सेनेचा राज्याध्यक्ष भीमाशंकर पाटील याने ओकली आहे.गेल्या चौसष्ट वर्षांपासून सीमाभागातील सरकारी मालमत्तेचे नुकसान करत आहेत.
कन्नडिग जनतेच्या डोळ्यात कुसळा प्रमाणे टोचत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला,त्याला माझा पाठिंबा आहे असे बेदरकार वक्तव्य भीमाशंकर पाटील याने पत्रकार परिषदेत केली आहे.
![Krv bhima s patil](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2019/12/IMG-20191226-WA0009-1050x525-1.jpg)
नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींना गोळ्या घाला असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केले आहे.गेल्या चौसष्ट वर्षपासून महाराष्ट्र एकीकरण समिती सरकारी मालमत्तेचे नुकसान करत आहे.
राकस्कोप जलाशयात विष टाकून कन्नड जनतेची हत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला असे सांगण्याचे धाडस मंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे आहे काय असा सवालही भीमाशंकर याने पत्रकार परिषदेत केला.