गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी आणि ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यात केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बेळगाव ग्रामीण क्षेत्रावर मराठी भाषिकांचा हक्क आहे असे वक्तव्य आमदार रमेश जारकीहोळी यांनी नावगे येथे आयोजित स्नेहभोजन प्रसंगी केले होते.या त्यांच्या वक्तव्यामुळे गदारोळ उठला आहे.रमेश जारकीहोळी यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री येडीयुरप्पा चांगलेच संतापले आहेत.बेळगावात कोणीही राज्य विरोधी वक्तव्य करू नये अशी प्रतिक्रिया येडीयुरप्पा यांनी व्यक्त केली आहे.
ग्रामीण मतदार संघ मराठी माणसाचा हक्काचा मतदार संघ आहे ग्रामीण भागात मराठी भाषिकांचे वर्चस्व आहे हा मराठ्यांचा मतदार संघ आहे.मराठ्यांनी एक व्हावं व लक्ष्मी यांना पराभूत करावं मी माझे पाच कोटी खर्च करतो असे वक्तव्य केले होते यावर मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला आहे प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.
रमेश जारकीहोळी यांनी लक्ष्मी यांच्यावर टीका करताना मराठा समाजाला एक करण्याची भाषा केली होती ती भाषा मुख्यमंत्र्यांना आवडली नसेल त्यामुळेच त्यांनी रमेश यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे की काय अशी चर्चा रंगताना दिसत आहे.