किल्ल्यातील व्होलसेल भाजी मार्केट ए पी एम सी ला शिफ्ट झाल्या पासून जय किसान भाजी व्यापारी संघटना आणि प्रशासन व इतर व्यापारी यांच्यातील कलगीतुरा संपता संपेना झाला आहे.जय किसान संघटनेनं न्यु गांधीनगर जवळ बांधत असलेलं प्रस्तावित मार्केटची इमारत राज्य सरकारने स्थगिती दिल्याने व सहा महिन्यांत व्यापाऱ्यांना गाळे बांधून देण्याचे अश्वासनाची पूर्तता न झाल्याने या व्यापाऱ्यांची समस्या जैसे थे आहे.
मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांनी आज एपीएमसीला भेट देऊन व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यामुळे शंकरगौडा पाटील आगामी काळात एपीएमसी वर आपले वर्चस्व ठेवण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.पाटील यांनी एपीएमसी सभागृहात व्यापाऱ्यांची बैठक घेतली.व्यापाऱ्यांनी आपली मते बैठकीत जाणून घेतली.काही व्यापाऱ्यांनी आणखी दुकाने बांधून व्यापाऱ्यांना द्यावीत अशी मागणी करण्यात आली.राज्यात अनेक ठिकाणी खासगी भाजी मार्केट आहेत त्यामुळे खासगी भाजी मार्केटला परवानगी देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली.बैठकीत अनेक जण एकाचवेळी बोलत असल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
व्यापाऱ्यांच्या समस्या मला समजल्या आहेत.या समस्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून लवकरात लवकर व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन शंकरगौडा पाटील यांनी दिले.
अपशब्द वापरल्याने तणाव
ए पी एम सी जुने नवे दलाल व्यापारी असा संघर्ष सुरूच आहे.मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकर गौडा पाटील यांनी ए पी एम सी मार्केटला भेट दिली असता जय किसान व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा बद्दल अपशब्द वापरल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी सतीश नावाच्या अपशब्द वापरलेल्या व्यापाऱ्याला जाब विचारण्यासाठी दुकानाला घेराव घातला त्यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाद मिटवला.
सतीश नावाच्या एकच व्यापाऱ्याची एपीएमसी तीन दुकाने आहेत त्याने एकेकाला बघून घेऊ असे म्हटले असा आरोप जय किसान संघटनेच्या व्यापाऱ्यांनी केला.गेल्या अनेक दिवसांपासून ए पी एम सी मार्केट मध्ये व्यापाऱ्यात अंतर्गत संघर्ष सुरूच आहे.उत्तरचे आमदार अनिल बेनके असो किंवा शंकर गौडा पाटील यांनी भाजी मार्केटचा तिढा सोडवण्याची गरज आहे अन्यथा व्यापारी दलाल यांच्यातील दुरावा कलगीतुरा रंगणारच आहे.