पेठ गल्ली कडोली येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. देवगिरी रोड येथील एका शेडमध्ये त्याने दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कल्लाप्पा बाबू बोकडे वय 55 राहणार पेठ गल्ली कडोली असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. त्याने नेमके कोणत्या करण्यासाठी आत्महत्या केली आहे याची माहिती अद्याप मिळाली नाही. खाते पोलिसांत फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू आहे.
घटनास्थळी काकती पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्रीसेल कौजलगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.