पर्यावरणाचा समतोल वृक्षतोडीमुळे बिघडत असताना बेळगाव परिसरातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी झाडे तोडायची मोहीमच हाती घेतली आहे.काही दिवसांपूर्वी डेपोत वाकिंग ट्रॅक साठी झाडांची कत्तल करण्यात आली.
आता पूर्ण वाढ झालेल्या वडाच्या झाडाकडे महानगरपालिका आयुक्तांची वक्रदृष्टी पडली आहे.व्हॅक्सीन डेपो मार्गावरील पोस्ट ऑफिस जवळ असलेल्या वडाच्या झाडाच्या फांद्या तोडायला सुरुवात झाली आहे.
काही जणांनी हे फांद्या तोडायचे कोणी सांगितले असे विचारले असता महानगरपालिका आयुक्तांचा आदेश आहे असे सांगण्यात आले.
एकूण काय तर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी मिळून बेळगाव बकाल करण्याचा विडाच उचलला आहे असेच वाटते.बेळगाव शहराला ऑक्सिजन पुरवणाऱ्या व्हॅकसीन डेपोतील वृक्षावर घाला चालूच आहे.अशीच वृक्ष तोडी झाल्यास या परिसराची निसर्गरम्यता नष्ट होईल आणि बेळगावच दिल्ली व्हायला वेळ लागणार नाही.