बेळगाव ग्रामीण भागातील हंगरगा आणि आजूबाजूच्या गावात दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या तीन चोरांना पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा आठ लाखाचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला आहे.
यल्लप्पा भावकू कुडचीकर(26),योगेश मल्लप्पा पाटील(26) आणि मोहन परशुराम पाटील(33) सगळे राहणार सुळगा अशी पोलिसांनी अटक केलेल्या चोरांची नावे आहेत.
या तीन चोरांनी हंगरगा आणि आजूबाजूच्या गावातील बंद घरे फोडून दिवसाढवळ्या चोरी करून फरार झाले होते.दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यामुळे लोकांत भीती निर्माण झाली होती.