किल्ला तलावात 13 वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला आहे. वाहिदअहमद रफिक अहमद लक्कुंडी वय 13 रा. सातवा क्रॉस वीरभद्रनगर असे त्याचे नाव आहे.
मार्केट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसां पासून वाहिद हा बेपत्ता होता तशी फिर्याद त्याच्या कुटुंबियांनी दिली होती त्याचा शोध सुरू होता गुरुवारी सकाळी किल्ला तलावात पाण्यावर तरंगत असलेला त्याचा मृतदेह काहींना दिसला त्या नंतर पोलिसांनी पंचनामा करून सदर मृतदेह शल्यचिकित्से साठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.
वाहिद हा 13 वर्षीय असून शर्मन शाळेत सातवीत शिकत होता त्याचा मृत्यू कश्या मुळे झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.आत्महत्या आहे की घातपात हे मृतदेहाची शल्य चिकित्सा झाल्यावर उघड होणार आहे मार्केट पोलिसांत या प्रकरणी फिर्याद दाखल झाली आहे.