मोठा गाजावाजा करून स्मार्ट सिटीत आपल्या बेळगाव शहराचा समाविष्ट झालं असे भासणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्याने बेळगाव शहराची पुरती वाट लावली आहे. विविध भागातील रस्ते खणून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार धोकादायक ठरत असून याबाबत आता विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या स्मार्ट सिटीच्या विकासाच्या विद्रुपीकरण आला बेळगावकर खरंच सलाम ठोकत आहेत.
बेळगाव शहरातील डीसीसी बँक, गोवा वेस, कॅम्प पोलीस स्टेशन यासह आदी भागातील रस्ते खोदण्यात आले आहेत. खोदण्यात आलेले रस्ते करण्यासाठी तब्बल वर्ष दीड वर्षाचा कालावधी लागत आहे. त्यामुळे हा रस्ता आणि पूर्वीचा रस्ता करण्यात आणि त्यावरून जाण्यात काहीच फरक नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीचे गाजर दाखवून शहराची पुरती वाताहत करणार्या अधिकार्यांनी नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार बंद करावा अशी मागणी होत आहे.
बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यापासून नागरिकांची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप होत असताना आता तर अक्षरश या रस्त्यावरून जाताना अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच रस्ते अर्धवट टाकल्याने अपघातही घडत आहेत. स्मार्ट सिटी ची घोषणा आणि रस्ते अर्धवट पडल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बेळगाव शहरातील रस्ते म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशा परिस्थितीत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या रस्त्यांचे विकासाचे काय? हा प्रश्न अंतर्मुख करणारा आहे. त्यामुळे विकासाचे गाजर दाखवून दिशाभूल करण्यात अनेकांना धन्यता मानले आहे.
बेळगाव शहरात आणि उपनगरात टिळकवाडी गोवावेस शहापूर कॅम्प पोलीस स्थानकात यंदे खूप कॉलेज रोड डीसीसी बँक मध्यवर्ती बस स्थानक फोर्ट रोड आदी भागात कामे सुरू करण्यात आली आहे. मात्र सर्वत्र रस्ते खोदण्यात आल्याने विकासाची पंचाईत होऊन बसली आहे. कंत्राटदार वेळेवर काम पूर्ण करत नसून अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांमुळे नागरिकांचे व्याप वाढले आहेत. त्यामुळे यापुढे तरी रस्ते सुस्थितीत करून आणि ते लवकरात लवकर करून नागरिकांना सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.