कर्नाटक आपले आहे हे भासवण्यासाठी कर्नाटक कुठल्या पातळीवर उतरेल हे काही सांगता येत नाही. याआधी मराठीमध्ये कन्नड घुसवण्याचा प्रकार सुरूच होता. तर आता इंग्रजीमध्ये ही कन्नड घुसविण्यात येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला पडले आहे. या कारभारामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधित विद्यापीठाने आपली चूक सुधारावी अशी मागणी होत आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या पदवीच्या बेसिक इंग्रजी विषयांमध्ये ते कन्नड विषय घुसविण्यात आल्याने अनेक विद्यार्थी अडचणीत आले आहेत. गोवा, महाराष्ट्र, गुजरात याचबरोबर सीमा भागातून विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेश घेतात. मात्र इंग्रजीत कन्नड घुसविण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही चूक विद्यापीठाने वारंवर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सीमाभागातील युवा समिती विद्यार्थी संघटना या घुसखोरी विरोधात आवाज उठविणार आहेत. त्यामुळे याबाबत लवकरच आंदोलन छेडून जाब विचारण्यात येणार आहे. प्रशासनाच्या आंधळ्या कारभाराला घालण्यासाठी आता रस्त्यावरील लढाई सुरू करण्यात येणार आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या प्रशासनाला याबाबत जाब विचारत येणार असून विद्यार्थ्यांच्या भविष्याचे खेळणे बंद करा असे सांगण्यात येणार आहे.
सध्या विद्यापीठाकडून पदवी परीक्षा घेतल्या जात आहेत. बीएससी तिसऱ्या सेमिस्टर चा बेसिक इंग्रजी या विषया पेपर होता. त्यामध्ये कन्नड बसविण्यात आल्याने अनेकांना कमी मार्क पडण्याची शक्यता आहे. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यां कन्नडची पुसटशीही कल्पना नसते. मात्र इंग्रजी विषयात कन्नड बसविण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांचा टक्काही घसरणार आहे. त्यामुळे यापुढे या चुका करू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे.