बेळगाव शहर आणि विविध भागात सध्या पॅन कार्ड फ्रॉड ने धुमाकूळ घातला आहे. बनावट नावाने पॅन कार्डे काढून अनेक बँकांमध्ये कर्जे काढण्यात येत असून याद्वारे आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. कर्ज भरण्यासाठी पॅन कार्ड धारकाला बँका तगादा लावत आहेत या घटनेत आपण कुठल्याही एजंट कढून पॅन कार्डे काढून घेणे महागात पडत आहे.
बेळगावच्या एक व्यक्तीने आपले पॅन कार्ड लोकल एजंट कढून काढून घेतले होते.काही दिवसांनी त्याला एक खासगी बँकेचा कॉल आला की तुम्ही घेतलेले कर्ज भरा, यासाठी चौकशी करण्यास ती व्यक्ती गेली असता त्याचा फोटो व पण नंबर वापरून दुसऱ्याच व्यक्तीने कर्ज काढल्याचे उजेडात आले . ज्या व्यक्तीकडून पॅन कार्ड काढून घेतले किंव्हा ज्या व्यक्ती कडून त्याचे कलर झेरॉक्स काढले त्यापैकीच एकाने हे कृत्य केल्याचा अंदाज असून घोटाळा करणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.
या बद्दल मार्केट पोलीस स्थानकात एफ आय आर देण्यात आले आहे. बेळगाव जवळील एक खेड्यातील तरुण यामध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाली असल्याने तपास सुरू आहे. यापुढे पॅन कार्ड काढताना काळजी घेण्याची गरज आहे.