दिपावळी सूरु झाली की बेळगावसह परिसरात वेगवेगळे किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात येतात अनेक युवक,युवती तसेच बालचमू यात रमलेले असतात.
त्याच पद्धतीने रयत गल्ली मा.वडगावमधील दोन तीन बालचमूंचे गट तयार करुन वेगवेगळे किल्ले बनवण्यात रमलेले असतात.रयत गल्ली तशी बहूसंख्य शेतकऱ्यांची असल्याने मातीशी त्यांचे दृढ नातेच जणू.
गल्ली नव्वद टक्के मराठी शेतकऱ्यांची असल्याने अनेक घरात एक दोन इतर भाषीक भाडोत्री आहेत. त्यांची मूलेही सर्वात मिळून मिसळून कोणत्याही भाषाभेदाला थारा न देता एकसंघ होऊन किल्ले करतात.
किल्ले संतोषगड सूबक सुंदररित्या साकारलाय तो मराठी आणि कानडी मिळून छोट्या बालचमूनीं.त्याचे परवा उदघाटन झाले. कुमार यश रामा खन्नूकर, कु.सुब्रमनण्य जनिवारद,कु.मनोज जनिवारद तसेच किल्ल्याची समग्र माहिती सागंणारा कु.शक्ती खन्नूकर या चार बालचमूनीं हा किल्ला सुबकरित्या साकारला आहे.त्यांच परिसरात सर्वत्र कौतूक होत आहे.