Thursday, April 25, 2024

/

राम मंदिर निकाला बाबत काय म्हणतात मुतालिक

 belgaum

अयोध्या राम मंदिराचा निवाडा हिंदूंच्या बाजूने लागेल असा आत्मविश्वास श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

पुरातत्व खात्याने देखील मंदिरावर मशीद बांधल्याचा पुरावा दिला आहे.त्यामुळे राम मंदिर निवाडा हिंदूंच्या बाजूने लागणार यात कोणतीही शंका नाही.निकाल लागलेल्या दिवशी सगळ्यांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन केले पाहिजे.

मंदिरात विशेष पूजा केल्या पाहिजेत. सगळीकडे मिठाई वाटून हिंदूंनी आनंद व्यक्त करावा.चुकून जर हिंदूंच्या विरोधात निकाल लागला तर मात्र खासदारांना निवेदन देऊन संसदेत न्याय मिळवावा लागेल असे मुतालिक म्हणाले.16 नोव्हेंबर रोजी राम मंदिरा बाबत निकाल येणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.