बेळगावचे जलतरणपटू सिमरन गौडाडकर,स्वस्तिक पाटील आणि साहिल जाधव यांची खेलो इंडियासाठी निवड झाली आहे.खेलो इंडिया ही भारत सरकारची क्रीडा संस्था असून येथे निवड झालेल्यांना पुढील आठ वर्षे प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार केले जाते.
बेळगावच्या निवड झालेल्या जलतरणपटूना गुजरातमध्ये तज्ञांच्याकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.पुढील आठ वर्षे त्यांचे शिक्षण,प्रशिक्षण आणि अन्य बाबींची जबाबदारी खेलो इंडियाकडून घेतली जाणार आहे.ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात या जलतरणपटूची निवड चाचणी झाली.
सिमरन,स्वस्तिक आणि साहिलने यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवून पुरस्कार मिळवले आहेत.सध्या हे जलतरणपटू सुवर्ण जे एन एम सी तलावात प्रशिक्षण घेत होते.त्यांना उमेश कलघटगी,प्रसाद तेंडोलकर,गुरुप्रसाद टेंगणकार,नितीश कुडचिकर, गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभले.डॉ प्रभाकर कोरे आणि अन्य व्यक्तीचे प्रोत्साहन यांना लाभले आहे.