देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच ध्वजस्तंभ म्हणून किल्ला तलावा जवळील ध्वजस्तंभ ओळखला जातो.या ध्वजस्तंभावर फडकवला जाणारा तिरंगा 120 फूट लांब आणि 80 फूट उंचीचा आहे.
भव्य आकाराचा ध्वज फडकवला असता वारा आणि पावसामुळे पुन्हा उतरवून ठेवावा लागतो.यासाठी हा ध्वज वर्षातून केवळ तीनवेळा फडकविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी,महानगरपालिका,प्रादेशिक आयुक्त,बुडा यांच्या बैठकीत वर्षातून तीन वेळा ध्वज फडकविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.स्वातंत्र्यदिन,प्रजासत्ताक दिन आणि कर्नाटक राज्योत्सव दिनी ध्वज फडकविला जाणार आहे.