मागील वर्षी दहावी मध्ये पहिल्या 100 क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका यावर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहेत. यावर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सर्वात मोठी खुशखबर हातामध्ये आली आहे .
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून मागच्या वर्षी दहावी मध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दिल्या जाणार आहेत. या उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती प्रत्येक शाळेत दिल्या जातील त्यांचा अभ्यास करुन चांगले गुण मिळवण्यासाठी कशाप्रकारे उत्तरपत्रिका लिहाव्यात त्याचे उदाहरण दहावीच्या विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. शिक्षण मंत्री एस सुरेश कुमार यांनी ही घोषणा केली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाचे रहस्य काय हे पाहण्याची संधी या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. पुढच्या वर्षी कर्नाटक राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर उत्तर पत्रिका प्रसिद्ध केल्या जाणार आहेत त्यामुळे वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना त्यांचे झेरॉक्स वैयक्तिक स्वरूपात मिळवता येणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्याचा निकाल चांगला लागावा. दहावीचे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावेत हा उद्देश यामागे ठेवण्यात आला आहे.