खडेबाजार सारख्या गजबजलेल्या परिसरात एका कपड्याच्या दुकानात चार दिवस नाग सापाने ठाण मांडले होते.केवळ दुकानातील कर्मचारी आणि ग्राहक यांचे दैव बलवत्तर म्हणून कोणताही अनर्थ घडला नाही.
युनूस शेख याच्या कशीष फॅशन या दुकानात चार दिवसांपूर्वी नाग सापाने दर्शन दिले होते.साप दिसल्यावर सर्पमित्र निर्झरा चिठ्ठी यांना बोलावण्यात आले.त्यांनी एक तास शोध घेतला पण त्यांना साप काही सापडला नाही.नंतर पुन्हा रविवारी नागराजाने दर्शन दिले.
नागराजची हालचाल सीसीटीव्ही ने देखील टिपली होती.पुन्हा आनंद चिठ्ठी यांना बोलावण्यात आले.आनंद यांनी अर्धा तास शोधाशोध करून अखेर नागराजाला पकडले.साप पकडण्याचे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.गेल्या अठरा वर्षात असा साप पकडला नाही.हा साप अतिशय रागीट असतो अशी माहिती आनंद चिठ्ठी यांनी दिली.