सीमा रेषा पुसून उत्तर भारतातील छट पूजा बेळगावात दाखल झाली आहे.व्यवसयाच्या निमित्ताने मजुरीच्या निमित्ताने शेकडो उत्तर भारतीय बेळगावात वास्तव्यास आले आहेत.
माणसाच्या विस्थापना बरोबर त्याची संस्कृती देखील दुसऱ्या भागात जाते त्याच प्रमाणे आपली संस्कृती जपण्याचा प्रत्येक जण जीवापाड प्रयत्न करत असतो.बेळगाव शहरातील अनगोळ तलावा शेजारी उत्तर भारतीयांनी रविवारी सकाळी छट पूजेचे आयोजन केले होते.
या निमित्ताने अनगोळ गावच्या तलावाच्या काठावर महिला वर्गाने सूर्य देवतेचेपूजन केलं.सूर्याला अर्ध्य दिल यावेळी ऊसाची मांडणी देखील करण्यात आली होती.
या निमित्ताने तिथं उपस्थित असलेल्या काही लोकांना उत्तर भारतातील या सांस्कृतिक परंपरेची या निमित्ताने ओळख झाली. रंगीबेरंगी साड्या परिधान करून आलेल्या सुहासिनीच्या मुळे आणि उजळलेल्या दिव्या मुळे अनगोळ तलावाचे रुप खास आकर्षक वाटत होते.विविध परंपरांनी बेळगाव समृद्ध व्हावं ही काळजी गरज आहे.