समुद्रस्नान करताना बेळगाव येथील दोन युवकांचा गोवा येथीलआश्वे-मांद्रे समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
बेळगाव येथील तीन पर्यटक दुपारी आले होते. पोहण्यासाठी ते समुद्रात उतरले त्यावेळी आदित्य कुमार मगदूम (26, समिद नगर, उद्यमबाग, बेळगाव) व अभिजित अशोक मगदूम (33, हिंदवाडी, बेळगाव) व त्याचा एक सहकारी पाण्यात उतरले. त्यातील दोघेजण बुडाले. तिसऱ्याला तेथील जीवरक्षकांनी वाचवले.
त्याला म्हापसा जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. किनाऱ्यावर दूर ठिकाणी असलेल्या जीवरक्षकाच्या लक्षात येताच त्यांना वर काढण्यात आले. त्यातील दोघे बुडाले व तिसरा जखमी आहे.
युवक बुडल्याची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक गोव्याला रवाना झाले आहेत. शुक्रवारी सकाळी पंढरपूरला जाताना अपघात होऊन बेळगावचे पाच जण ठार झाले होते त्या अगोदर देशाचे रक्षण करताना गुरुवारी रात्री उचगावचा जवान जम्मू मध्ये हुतात्मा झाला होता आज बेळगावचे दोघे युवक समुद्रात बुडून मयत झाले आहेत. गेल्या दोन दिवसात बेळगाव शहर परिसरात घडलेली ही तिसरी दुःखद घटना आहे.