चंदगडचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मागणी सीमाभागातील जनतेकडून केली जात आहे.
राजेश यांचे वडील कै नरसिंगराव पाटील यांनी चंदगड मतदार संघातून निवडून आल्यावर अनेक लोकोपयोगी प्रकल्प राबवले होते.दौलत साखर कारखाना उभारण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते.सीमाभागातील मराठी बांधवांचा अनेक वेळा त्यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.महाराष्ट्रात तसेच केंद्रातील नेत्यांकडे त्यांनी सीमाप्रश्न मांडून सीमालढ्याला बळकटी दिली होती.1996 मध्ये तर दौलत साखर कारखान्यावर झालेल्या शरद पवार यांच्या उपस्थितीत सिमप्रश्नासंबंधी अंतिम तोडगाही काढण्यात आला होता पण सीमावसीयांच्या दुर्दैवामुळे तो तोडगा मागे पडला.
आता सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सत्तेत असताना म्हणावे तेव्हढे सीमाप्रश्नाच्या दाव्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.चंद्रकांत दादा पाटील यांना सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री म्हणून नेमण्यात आले होते पण त्यांनी एकदाही सिमभागाला भेट देऊन सीमावसीयांच्या व्यथा जाणून घेतल्या नाहीत.त्यामुळे सीमावसीयांच्या समस्या,वेदना यांची जाणीव असलेले राजेश पाटील यांना मंत्रीपद दिल्यास सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळेल अशी सिमावासीयांची अपेक्षा आहे.
मागील पाच वर्षात भाजपच्या कार्य काळात समन्वयक मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांनी सीमा भागाचा समन्वयचं ठेवला नव्हता उलट बेळगावातील मराठी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार त्यांनी केला होता.त्यामुळे त्यांच्यवर सीमा भागात नाराजीचा सूर आहे.होणारे मुख्यमंत्री शिव सेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या बेळगाव समन्वयक मंत्री म्हणून पाटील यांना नियुक्त करावे अशी मागणी होत आहे.
पाटील यांची आमदारकीची पहिली टर्म असली तरी ते बेळगावात वास्तव्यास असतात त्यांचे शिक्षण बेळगावात झाले आहे त्याना मंत्री करा अशी देखील मागणी होऊ लागली आहे.