Thursday, December 26, 2024

/

या खेळाडूला आहे मदतीची गरज

 belgaum

अनगोळ रघुनाथ पेठ येथील कु. आरती सुरेश पवार (दिव्यांग) बास्केट बॉल स्पर्धेत सुयश मिळविले आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्रच अभिनंदन होत आहे. मात्र तिला पुढील मदतीसाठी आर्थिक मदतीची गरज असून मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरती पवार ही आशिया ओशिनिया झोन आणि २०२० टोकियो क्वालिफायर्स, येथे २९ नोव्हेंबर ते ०७ नोव्हेंबर २०१९ दरम्यान थायलंड येथे होणाऱ्या आशियाई बास्केटबॉल स्पर्धेत भारतीय (अपंग) बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व (कर्णधार) म्हणून करणार आहे. तिची ही कामगेरी बेलगावकारासाठी अभिमानास्पद बाब आहे.

Aarti pawar
Aarti pawar

आरती हिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी थायलंड येथे जाण्याचा खर्च तसेच चैन्नई येथे सुरू असणाऱ्या शिबीराचा खर्च आर्थिक परिस्थितीमुळे परवडणारा नाही. यामुळे आरती पवार यांना पूढील यशासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरती यांच्या घरची परिस्थिती बिकट असल्याने दहावी नंतरचे शिक्षण घेता आले नाही. याचीच पुनरावृत्ती टाळण्यासठी संघ संथा दानशूर व्यक्ती युवक मंडळे यांनी आर्थिक मदत करावी ही विनंती करण्यात आली आहे.
A/C NO : 05492210010893
IFSC NO: SYNB0000549.

9036536900 (मोबाईल आरती पवार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.