एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात अशी अवस्था महाराष्ट्रातील सरकारचे झाली होती. मात्र हे चित्र स्पष्ट झाले असून महाआघाडीने आपले सत्ता स्थापन करण्यावर भर दिला आहे. लवकरच शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. या सरकार स्थापनेनंतर सीमा प्रश्नाला नक्कीच बळकटी मिळणार आहे, अशा बेळगावकर व्यक्त करण्यात येत आहे.
मागील 63 वर्षापासून सीमा भाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. येथील जनता लोकशाहीने महाराष्ट्रात जाण्यासाठी लढा देत आहेत. हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरील लढाई सुरू ठेवली आहे. अशा परिस्थितीत एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारजी आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी वारंवार सीमा प्रश्नाला बळकटी दिली आहे. आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून सरकार स्थापन केल्यामुळे सीमा प्रश्नाला बळकटी येणार आहे.
सीमाप्रश्नाच्या हुतात्मा मध्ये शिवसेनेचे हुतात्मे अधिक आहेत. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र लढा सुरूच आहे. आता नुकतीच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर सीमाभागातील जनतेला दिलासा मिळणार आहे. सरकार स्थापनेनंतर तातडीने हा प्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न होण्याची गरज सीमाभागातील नागरिक व्यक्त करू लागले आहेत. कर्नाटकाच्या अन्यायाला चाप बसण्यासाठी महाआघाडी सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.
गुरुवारी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी कार्यक्रम होणार आहे. शपथविधीनंतर काही दिवस गेल्यावर बेळगाव येथील समितीचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. सीमा प्रश्नासाठी तातडीने प्रयत्न करून सीमा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे. सध्या स्थापन झालेल्या सरकार कडे सीमा वासियांचे आशा लागून राहिली आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करावा अशीच मागणी सध्या तरी होत आहे.