या अपघातातील चक्काचूर झालेला दुचाकींचा फोटो पहिल्यास दुचाकीस्वाराची काय अवस्था झाली असेल याचा विचार करू शकता मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून हा दुचाकीस्वार सही सलामत बचावला आहे
शनिवारी सकाळी हलगा गावच्या सर्व्हिस रोड वरील बस स्थानका जवळ भरधाव वेगाने बेळगावकडे जाणाऱ्या टिपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली दुचाकी टिपरच्या मागील चाकात अडकली त्यावेळी दुचाकी स्वाराने बाहेर उडी टाकली अन तो या अपघातातून बचावला.
वृद्ध टिपर चालक दारूच्या नशेत होता त्याला गाडी नियंत्रित करता आली नाही टिपरने दुचाकीला चिरडले. हा अपघात पहाण्यासाठी गर्दी झाली होती सदर दुचाकी स्वार निवृत्त हेड कॉन्स्टेबल कौजलगी असे त्याचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.