शहरात सातबाराचा घोळ सुरूच आहे. शहरी भागातील बिगर शेती सर्व सातबारा उतारे अजुनी देण्यात येत असल्याने अनेक आत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. बिगर शेतकी असलेल्यांना मिळकत पत्र देऊन सातबारावरील नाव कमी करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याने मोठा गोंधळ होत असून यापुढेही असेच राहिल्यास तर अनेक गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरात हजारो सातबारा बिगर शेती नसलेल्याच्या नावावर आहे. यासाठी हे सातबारा बंद करून उर्वरित तपासणी मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्यांचे सातबारा उतारे बंद करण्यात आले आहेत त्यांना मिळकती पत्र देऊन त्यांची सोय करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरात अनेक ठिकाणी मिळकतीचा सातबारा आहे. त्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देऊन नागरिकांची सोय करण्याची मागणी होत आहे. बिनशेती झालेला सातबारा बंद करावा आणि त्यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करावे, अशी मागणी होत असताना याकडे दुर्लक्ष करून नागरिकांची दिशाभूल सुरू असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे.
गावठाणची मोजणी करण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करण्याची गरज आहे आणि कंपन्यांना याचे कंत्राट देऊन सातबारा कमी करून प्रॉपर्टी कार्ड दिल्यास अनेकांना सोयीचे ठरणार आहे. अशा प्रकारामुळे अनेकांच्या जमीन नको त्यांच्या नावावर चढत असल्याचे उघडकीस होत असतानाच गैर प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही उघडकीस येत आहे. याचा विचार करून संबंधित विभागाने सातबारा उतारा वरील नाव कमी करून प्रॉपर्टी कार्ड देण्याची गरज व्यक्त होत आहे.