Friday, December 20, 2024

/

यांनी असाही केला दसरा साजरा…

 belgaum

आज खऱ्या अर्थाने दसरा साजरा केल्याचे समाधान होत आहे. दरवर्षी आपट्याची पानं वाटून दसरा साजरा करत होतो पण आज गरीब आणि गरजू व्यक्तींना मदत करून त्यांना दसरा सण साजरा करण्यास आमच्या परीने मदत केली.त्यामुळे आज खऱ्या अर्थाने दसरा साजरा केल्याचे समाधान लाभले असल्याचे उदगार वन टच फाऊंडेशनचे विठ्ठल पाटील यांनी काढले.

आपण केलेल्या आर्थिक मदतीमुळे कुणाच्यातरी जीवनाची गाडी रुळावर येऊ शकते. एकवेळच्या जेवणाची भ्रांत पडलेल्याला पोटभर अन्न मिळू शकते, उपचाराअभावी मरण मागणाऱ्याला नवसंजीवनी मिळू शकते, गरीब मुलांना शिक्षण आणि बेघराला निवारा मिळू शकतो. कदाचित आपण एकट्यानेच केलेल्या मदतीतून हे शक्य वाटत नसले तरीही आपल्या सारख्या अनेक दानशूरानी मिळून केलेल्या मदतीतून हे शक्य असते असेही विठ्ठल पाटील म्हणाले.

महात्मा गांधी कॉलनी टिळकवाडी येथे राहणाऱ्या वृद्ध दांपत्याला आणि त्यांच्या मुलीला आणि कोनवाळ गल्ली येथे राहणाऱ्या आजीबाई श्रीमती लीलाबाई आनंदाचे यांना नित्योपयोगी वस्तू दसरा सणाचे औचित्य साधून देण्यात आल्या. तांदूळ, डाळ, तेल, साखर,चहा पावडर, कडधान्य, बिस्किटे, तिखट, साबण, साडी आणि चादर आशा वस्तू वन टच फाऊंडेशनतर्फे देऊन दसरा सण साजरा करण्यास मदत केली.यावेळी वन टच हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील, उपाध्यक्ष संतोष गंधवाले, जयप्रकाश बेळगावकर ,शिल्पा केंकरे, विनायक कडोलकर आणि अभी भातकांडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.