चढतीला बुलेरो गाडीवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना काकती सोनट्टी रोडवर बुधवारी रात्री घडली आहे.रामचंद्र तुकाराम पाटील वय 60 रा. मौजे कारवे तालुका चंदगड महाराष्ट्र असे या अपघातात मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
या बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार चंदगड तालुक्यातील मौजे कारवे येथील भजनी मंडळ हुंचेवारी मठात सुरू असलेल्या पारायण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जात होते. सोनट्टी जवळील चढतीला वाहन चालकाचे बुलेरो वरील नियंत्रण सुटले त्यानंतर बुलेरो गाडी पलटी होऊन खड्ड्यात पडली त्यामुळे हा अपघात घडला.
रात्री दहा च्या दरम्यान हा अपघात घडला होता.या गाडीतून 25 जण प्रवास करत होते अपघाताने जखमी एकमेकांवर पडले त्यात रामचंद्र यांचा मृत्यू झाला. दहा जण किरकोळ जखमी झालेत त्यांना सिव्हिल मधून प्रथम उपचार करून सोडण्यात आले या अपघाताची नोंद काकती पोलिसांत करण्यात आली आहे.