Wednesday, September 11, 2024

/

नेहरूनगर सदाशिवनगर परिसर झाला भगवामय

 belgaum

भगवेमय वातावरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाने नेहरू नगर, सदाशिव नगर दुमदुमून गेला.आज बुधवारी दौडी च्या चौथ्या दिवशी ही शिवप्रेमींनी हजारोंच्या संखेने सहभागी होऊन देव,देश,धर्माच्या रक्षणासाठी चाललेल्या दौडी मध्ये आपला सहभाग नोंदवला.

चौथ्या दिवशी उत्तर बेळगाव मधील हा परिसर भगवा मय बनला होता त्यातच शिवराय आणि हर हर महादेवाच्या घोषणानी सहभागी युवकात युवती मध्ये उत्साह संचारला होता.

यावेळी महिलांनी काढलेल्या रांगोळ्या, शिवप्रेमींन वर होणारी पुष्प वृष्टी, दारोदारी होणारे स्वागत यामुळे वातावरण उत्साही बनले होते. नेहरू नगर येथील बसवाण्णा मंदिर येथून दौडीस प्रारंभ झाला. पोलिस निरीक्षक जे एम कालिमिरची यांच्या वतीने आरती करून ध्वज चढवण्यात आला.

सदाशिव नगर, नेहरू नगर, सुभाष नगर, गँगवाडी, रामनगर, अशोक नगर, शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिर येथी दौडीची सांगता करण्यात आली या वेळी उद्योजक सिध्दार्थ सुरेश हुंदरे यांच्या हस्ते आरती करून ध्वज उतरवण्यात आला.

उद्या ची दौड
शिवतीर्थ मिल्ट्री महादेव, कॅम्प परिसर ते शंभू जत्ती मठ

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.