सार्वजनिक ठिकाणी लोखंडी बोर्ड तयार करून महाराष्ट्र राज्य फलक लावल्याच्या आरोपातून बी के कंग्राळीच्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
चव्हाट गल्ली बी के कंग्राळी येथे सार्वजनिक ठिकाणी फलक लावल्याचा आरोपातून जयराम पाटील गजानन हुरडे मयूर बसरीकट्टी रामकृष्ण निलाजकर किरण पवार आणि महेश निलजकर सर्वजण रा. कंग्राळी बुद्रुक यांची निर्दोष मुक्तता झालो आहे. जे एम एफ सी चतुर्थ न्यायालयाने हा आदेश दिलाय.
महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवल्या नंतर बेळगाव तालुक्यातील अनेक गावागावात फलक उभारण्यात आले होते त्या सर्वांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.चौथ्या जे एम एफ सी न्यायाधीश शंभू माडीमठ यांनी साक्षीदारांतील विसंगती मूळे निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयात निकालाच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते याललोजी तानाजीराव पाटील,समीर जाधव आणि नागेश हन्नूरकर हे उपस्थित होते. समिती कार्यकर्त्यांच्या वतीनं वकील शामसुंदर पत्तार,हेमराज बेंचनांवर सुभाष पट्टण शंकर बाळ नाईक व विशाल चौगुले यांनी काम पाहिले.